ग्रामपंचायत एरंडगाव अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

ग्रामपंचायत एरंडगाव अंर्तगत मौजे एरंडगाव, वाकपूर व दादापूर या तीन गावाचा समावेश असुन हि तीनही गावे रायघोळ नदीच्या काठावर वसलेली आहे. अमरावती हे जिल्हाचे ठिकाण गावापासून ३० कि.मी. तर तालुक्याचे ठिकाण नांदगाव खंडेश्वर हे गावाजवळून १५ कि.मी. अंतरावर आहे.गावात ST महामंडळाची बसेस दिवसातून ३ वेळा येत असुन सर्व विद्यार्थी व जेष्ठ नागरिक यांना बस सेवेचा लाभ होतो. ३ कि.मी. अंतरावर मांजरी म्हसला येथे गावाची सर्कल राष्ट्रीयकृत बँक ऑफ बडोदा तसेच गावात मिनी बँक सेवा आहे. गावापासून मालखेड रेल्वे स्टेशन ६ कि.मी. टीमटाळा रेल्वे स्टेशन ९ कि.मी. व तसेच महत्वाचे म्हणजेच बडनेरा जंक्शन रेल्वे स्टेशन १८ कि.मी उपलब्ध आहे.

गावात पुरातन राजवाडा एक शोभनीय वास्तू आहे. तसेच गावात श्री. संत बिहारीलाल महाराज योगी संत होऊन गेले आहे त्याचे गावात मंदिर व सभागृह आहे. गावाबाहेरील नदीच्या काठी लोकसहभागातून शंभूशेष व महादेवाचे मंदिर आहे. गावात शेती सदन झाली असुन संत्रा, कापूस, सोयाबीन, तूर, चना हे मुख्य पिके घेतली जातात. त्यामुळे येथील लोकांचा आर्थिक स्थर सर्वसाधारण विकसित झालेला दिसतो.

एरंडगाव ग्रामपंचायतची स्थापना सन १९५८ या वर्षी झाली. २०११ च्या जनगणने नुसार गावाची लोकसंख्या १३९८ होती त्यांत स्त्रीया ६९७ पुरुष ७०१ इतके आहे गावात जिल्हा परिषद शाळा २ आहे . एरंडगाव गाव प्रथम अंगणवाडी स्थापना १९६० झाली असुन सद्या गावात २ अंगणवाडी केंद्र आहे. गावात महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार असे अनेक पुरस्कार गावाला मिळालेले आहे शैक्षणिक व आर्थिक प्रगती बरोबरच व्यक्तीच्या शाररीक, मानसिक, बौद्धिक गुणांचा विकास या गावातील जनतेला झालेला आहे गावात होणाऱ्या प्रत्येक विकास कामात सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच कर्मचारी व ग्रामस्थ यांचा सहभाग असतो विकास कामाना सर्व स्तरावरुन पाठिबा असतो गावात पूर्णपणे लोकसहभागतून दारूबंदी करण्यात आली आहे. गावात मध्यठिकाणी जेष्ठ नागरिक करिता नाना-नानी स्पॉट बांधकाम करून गावातील जेष्ठ लोकांना सम्मान दिला आहे गावाचा वैभवात आणकी मानाचा तुरा म्हणजेच गावातील ग्रामदैवत श्री. संत बिहारीलाल महाराज संस्थान यासाठी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त प्रयत्नातून सभागृहाचे बांधकाम करण्यात आले आहे या ठिकाणी बरेच विकास झालेली आहे व होत आहे.

एरंडगाव गावचे मुख्य व्यवसाय शेती असुन मुख्य पिक सोयाबीन व कापूस आहे गावाच्या वतीने लोक सहभाग मार्फत गावातील बिहारीलाल मंदिर, मसानभूमी विकास, नियमित पाणीपुरवठा करणे या कामी सहकार्य केले आहे गावाचे प्रमुख रस्ते हे डाबरीकरण व सिमेंटचे केले आहे गावातील मुख्य सार्वजनिक जागेवरील गटारे बंदिस्त केले आहे गावातील जि.पं. शाळेत डिजिटल दर्जेदार शिक्षण दिले जात आहे पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत असुन ग्रा.पं. मार्फत पाणीपुरवठा होत आहे दोन वर्षात अंदाजे १ कोटी विकास कामे पूर्ण केलेली स्वच्छता अभियान अंतर्गत सर्व संस्था सरकारी कार्यालय,शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र या सर्वच ठिकाणी शौच्छालय नियमित वापर होत आहे.

  1.  

“एकच ध्यास एरंडगाव गावचा सर्वांगीण विकास”

ग्रामपंचायतीचे विशेष कार्य व प्राप्त झालेले पुरस्कार

  1. सन 2022–23 मध्ये आर.आर.आर. अबा पाटील सुंदर गाव योजनेतून
    जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार – ४० लक्ष रु.
  2. सन 2022–23 मध्ये आर.आर.आर. अबा पाटील सुंदर गाव योजना
    तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार – १० लक्ष रु.
  3. माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत सहभागी असून
    विविध तपासणी पूर्ण करण्यात आली.
  4. सन 2023–24 मध्ये गोवर्धन ग्रामस्वच्छता अभियान विशेष पुरस्कार –
    पाणी गुणवत्ता व व्यवस्थापन.
  5. स्वच्छ गाव अभियान अंतर्गत 2022–23 तालुकास्तरीय पुरस्कार.
  6. टी. बी. मुक्त गाव पुरस्कार प्राप्त.
  7. सन 2023–24 मध्ये लोकमत सरपंच पुरस्कार प्राप्त.
  8. तालुकास्तरीय पहिली कोरोना मुक्त गाव म्हणून गौरव.
  9. सरपंच ग्रामपंचायतला सन 2022–23 मध्ये ODF Plus
    अधिकृत मानांकन प्राप्त.
  10. जिल्ह्यातील पहिली रोल मोडेल ग्रामपंचायत.
राज्यातील प्रमुख ग्राम विकास मुख्य मंत्रीमंडळ

श्री. विष्णू देव वर्मा

राज्यपाल

श्री. देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री

श्रीमती.सुनेत्रा अजित पवार

उपमुख्यमंत्री

ceo

श्री.सत्यम गांधी

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)

मा.बाळासाहेब बायस

उपमुख्य कार्यकारी अधिकारी

कु.डॉ स्नेहल शेलार

गट विकास अधिकारी प.स.

सौ. माया पांडुरंग घोडे

प्रशासक

श्री. गौतम देवराव गडलिंग

प्रशासक समिती सदस्य

कु. ज्योस्ना भानुदासराव इसळ

ग्रामपंचायत अधिकारी

ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी

श्री. राजीव वामनराव घोडे

मा. उपसभापती

सौ. सुनिता नंदकिशोर बंड

प्रशासक समिती सदस्य

सौ. अश्विनी सुभाष पुंड

प्रशासक समिती सदस्य

श्री. लिलाधर भिमराव झिमटे

प्रशासक समिती सदस्य

सौ. वैशाली प्रभाकर गभणे

प्रशासक समिती सदस्य

श्री. संदीप बबन भले

प्रशासक समिती सदस्य

प्रिया राजेंद्र हरणे

ग्राम महसूल अधिकारी

श्री. रविंद्र लहानुजी गजभिये

मुख्याध्यापक शाळा एरंडगाव

श्री. राहुल दिनकर तिडके

एरंडगाव तंटामुक्त अध्यक्ष

शुभम गणेश वैद्य

संगणक परिचालक

अश्विनी प्रफुल्ल वानखडे

सहाय्यक कृषी अधिकारी

श्री. अतुल रामराव कारमोरे

ग्रा.पं. पाणीपुरवठा कर्मचारी

श्री. चंद्रशेखर आनंदराव तायडे

ग्राम रोजगार सेवक

सतीश भास्करराव देशमुख

पोलीस पाटील

अविनाश हरीदासजी बंड

ग्रा . प. कर्मचारी एरंडगाव

गावातील प्रमुख आकर्षणे